⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदीच्या किंमतीला लगाम ; गेल्या दोन आठवड्यात झाली ‘एवढी’ घसरण..

सोने-चांदीच्या किंमतीला लगाम ; गेल्या दोन आठवड्यात झाली ‘एवढी’ घसरण..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । जुलै महिन्यात सोने-चांदीची (Gold Silver Rate Today) घौडदौड झाली होती. ऑगस्ट महिन्यात किंमती सूसाट धावतील असा अंदाज होता. मात्र, दोन्ही धातूंना या महिन्यात मोठी उडी घेता आली नाही. सोने थेट 58,000 रुपयांच्या घरात आले. Gold Silver Rate Today

या महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी विक्रमाला गवसणी घातली होती. त्यानंतर मात्र तीन महिन्यात दोन्ही धातूंना कोणताही नवीन विक्रम करता आला नाही. ऑगस्ट महिन्यात दोन आठवड्यात किंमतींना लगाम लागला.

या महिन्यात गेल्या दोन आठवड्यात सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. सोन्यामध्ये केवळ दोनदा वाढ झाली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली. त्यानंतर भावात सातत्याने घसरण होत आहे. शनिवार, रविवार आणि मंगळवारी राष्ट्रीय सुट्टी आल्याने भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने भाव जाहीर केलेले नाही. गुडरिटर्न्सने सोने-चांदीचे भाव जाहीर केलेले आहे.

काय आहे भाव?
22 कॅरेट सोने 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,760 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.