---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीत मोठी वाढ ; वाचा आजचा नवे दर

gold silver price
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज सोने प्रती दहा ग्रॅम ५९० रुपयाने वाढले आहे. तर चांदी आज प्रती किलो १४१० रुपयाने महागली आहे.

gold silver price

मागील गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आलीय.कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे.

---Advertisement---

सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत तब्बल आठ ते साडेआठ हजार रुपयांनी स्वस्त आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.

एरव्ही जुलै-ऑगस्टचा हंगाम सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो. पण आता दर कमी झाल्याने अनेक जण गुंतवणूक म्हणून तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणाऱ्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करत आहेत.

जळगावच्या सुवर्ण बाजारात या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति १० ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास १५०० ते २००० हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. गेल्या वर्षापासून मोठी भाववाढ होऊन सोन्यापेक्षाही अधिक भाव झालेल्या चांदीच्या भावात अचानक मध्येच मोठी घसरण तर कधी मोठी भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ ऑगस्टला चांदीच्या प्रति १ किलोचा ६९,८०० रुपये इतका होता. तो आता ५००० ते ५५०० हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८०४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,०४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,७२० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---