बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

ग्राहकांना झटका! एकाच दिवसात सोने 1500 रुपयांनी तर चांदी 1700 रुपयाची महागली

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२३ । ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate Today) किमतीत घसरण सुरु होती. आठवड्याहून अधिक दिवस ही घसरण कायम राहिल्याने सोन्यासह चांदीचा दर सात महिन्याच्या नीच्चांकीवर आला होता. एक आठवड्यापूर्वी दोन्ही धातून दिवाळीपर्यंत स्वस्त होण्याचा अंदाज बांधल्या जात होता. मात्र इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे दोन्ही धातूंनी पुन्हा मोठी झेप घेतली आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
नवरात्रोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काल शनिवारी जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात एकाच दिवसात १,५०० ते १७०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याने पुन्हा ६० हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीच्या किमतीत देखील १७०० रुपयाची वाढ दिसून आलीय. यामुळे सोन्याचा दर ६०,७०० रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ७२ हजार रुपयावर गेला आहे.

आठवड्याभरात अशी झाली वाढ
दरम्यान गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ५७,९०० रुपये प्रति तोळा इतका होता. मात्र सोमवारी (९ ऑक्टोबर) सोन्याच्या किमतीत ६०० रुपयाची वाढ होऊन ५८,५०० रुपये प्रतितोळा इतका झाला. मंगळवारी (१० ऑक्टोबर) भाव स्थिर होता. बुधवारी (११ ऑक्टोबर) १०० रुपयांनी वाढून ५८,९०० रुपयावर गेला, गुरुवारी(१२ ऑक्टोबर) २०० रुपयाची घट होऊन ५८,६०० रुपये झाला. शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) ५९,००० रुपये प्रतितोळा आला. आणि काल शनिवारी तब्बल १,५०० ते १७०० रुपयांची वाढ झाली.

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं आल्यास गेल्या आठवड्यात चांदीचा दर ६९,५०० रुपये प्रति किलो इतका होता. या आठव्याभरात त्यात तब्बल २५०० हजार रुपयाची वाढ दिसून आली. दरम्यान, आगामी दिवसात सोने आणि चांदीचे दर कुठवर जातात याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.