जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । एक दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात आज गुरुवारी पुन्हा वाढ झाली आहे. तर चांदी स्वस्त झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलो ५०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोने आणि चांदी स्वस्त झाली होती.
मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांनंतर १ जूनपासून बाजारपेठ सुरू झाली आणि सोने-चांदीच्या भावात काही दिवस भाववाढ होत राहिली. त्यामुळे १० जून रोजी सोने ५० हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर, मात्र त्यात घसरण होत गेली व २५ जूनपर्यंत ते ४७ हजार ५०० रुपयांपर्यंत आले होते. नंतर १ जुलैपासून दररोज भाववाढ होत गेली. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी २१० रुपयांनी वाढ होऊन ४७ हजार ४९० रुपयांवर पोहोचले.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८३८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,३८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६०८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,०८० रुपये आहे.
चांदीचा भाव
आज चांदी ५०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,९०० रुपये इतका आहे.