⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर..! चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, सोनेही घसरले ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

खुशखबर..! चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, सोनेही घसरले ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२२ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले. अमेरिकेतील फेडरल बँकेने व्याजदर कमी केल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. दरम्यान, आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. Gold Silver Rate Today

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX वर आज दुपारी 1 वाजेनंतर सोन्याची किंमत 391 रुपयांनी घसरली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किमत 54,240 रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत आज मोठी घसरण झाली आहे. आज दुपारी चांदीच्या किमतीत तब्बल 1387 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 67,915 रुपायांवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, जागतिक पातळीवर सोने दरात झालेल्या वाढीचा अथवा कमी होण्याचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीवर दिसून येतो. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पण ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचं बघायला मिळत आहे. वाढत्या दरातही मोठ्या संख्येने ग्राहक हे सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं दिसून येतंय. या गर्दी मागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे सध्या सुरू असलेली लगीन सराई आणि दुसरे म्हणजे सोने दरात अजून वाढ होण्याचा अंदाज. यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.

आज जळगाव सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजारावर आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर
मुंबई – 54880
मुंबई उपनगर – 53018
कोल्हापूर – 56,385
सातारा – 53,521
सांगली – 54,600
पुणे – 4530
नाशिक – 54,560
अहमदनगर – 52,920
नागपूर – 54,800
बीड- 54,000
औरंगाबाद – 54,400
वर्धा- 53,700
सोलापूर – 53,515
अमरावती- 53,690

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.