जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । सध्या सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होताना दिसत आहे. या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सराफा बाजारात घसरण दिसून आली. तर मंगळवारी बाजार तेजीसह उघडला. मंगळवारी सकाळी सोन्याच्या दरात 200 रुपयांपर्यंतची वाढ नोंदवण्यात आली. तर चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे.
यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,275 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 85,470 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू होती.
मल्टी कमोडिटीवर सोने आणि चांदीची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याची किंमत 0.23 टक्क्यांनी वाढली आहे, म्हणजेच 163 रुपये आणि 72,018 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदीची किंमत 0.54 टक्क्यांनी वाढली आहे, म्हणजे 458 रुपये प्रति किलो आणि ती 85,344 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.