ग्राहकांना मोठा झटका ! पाच दिवसात चांदी 4500 रुपयांनी वधारली, सोने.. ; पहा नवीन दर
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । जागतिक बाजारातील घडामोडीचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत सोन्यासह चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्याने दिलासा मिळाला होता. परंतु आता सोने आणि चांदीने पुन्हा भरारी घेतली असून दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली. Gold Silver Rate Today
जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 54,700 रुपये. तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 60000 रुपयापर्यंत पोहोचला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 75000 रुपयावर पोहोचला आहे.
यापूर्वी या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (10 जुलै) सोन्याचा दर सकाळच्या सत्रात 59,100 रुपयापर्यंत होता. मंगळवारी हा दर 59000 रुपयावर आला. बुधवारी 59,300 रुपये आणि काल गुरुवारी सोन्याचा वाढून 60000 रुपयावर गेला आहे. गेल्या पाच दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 800 ते 1000 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.
चांदीचा दर सोमवारी (10 जुलै) सकाळच्या सत्रात 70,600 रुपयावर होता. मंगळवारी त्यात 900 रुपयाची वाढ होऊन तो 71,500 रुपयावर आला. बुधवारी 72000 रुपयांवर चांदी गेली. गुरुवारी त्यात जोरदार वाढ होऊन चांदीचा दर 74000 रुपयावर पोहोचला. आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात चांदीचा दर 75000 रुपये इतका आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील आजचा सोने-चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, आज शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव किंचित वाढून 59,275 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 300 रुपयांनी वाढून तो 75,631 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.