⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आता एटीएममधून पैसे काढणे महाग, मोठ्या बँकांनी वाढवले ​​शुल्क

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । देशभरातील सर्व मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनी एटीएममधून पैसे काढण्याबाबत बदल केले आहेत. आता ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी (ATM transaction limit) अधिक पैसे मोजावे लागतील.  ठराविक मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला दरवेळी 21 रुपये मोजावे लागतील. याशिवाय ग्राहकांना जीएसटी द्यावा लागेल. अगोदर ही रक्कम 20 रुपये होती, ती आजपासून 21 ते 22 रुपये करण्यात आली आहे.

3 व्यवहार विनामूल्य आहे
एटीएम विड्रॉलमध्ये आर्थिक आणि गैर-वित्तीय सेवा देखील समाविष्ट आहेत. साधारणपणे एका महिन्यात 3 व्यवहार मोफत असतात. यानंतर विविध बँकांचे नियम आणि शुल्क लावण्यात आले आहे.

21 रुपये प्रति व्यवहार शुल्क निश्चित
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी एका परिपत्रकात म्हटले होते की मासिक मोफत व्यवहारांपेक्षा जास्त पैसे काढल्यास प्रति व्यवहार 21 रुपये शुल्क आकारले जाईल. नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू झाला आहे. काही मोठ्या बँकांच्या एटीएम व्यवहारांच्या मर्यादा आणि शुल्कांबद्दल जाणून घ्या. या बँकांमध्ये SBI, PNB, HDFC, ICICI बँक आणि Axies बँक यांचा समावेश आहे.