⁠ 
शनिवार, मे 4, 2024

Gold Silver Today : सोने – चांदीच्या किंमतीत घसरण, ‘हे’ आहेत आजचे दर

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । सोने आणि चांदी दरात चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान, आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात १५० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी ४५० रुपयांने घसरली आहे. आज गुरुवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,६३३ रुपयांपर्यंत खाली आला. त्यात १६९ रुपयांची घसरण झाली. आज सोन्याचा भाव इंट्राडेमध्ये ५०,६०१ रुपयांपर्यंत खाली आला होता.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price) घसरल्याचे पहायला मिळत आहे. सध्या अमेरिकेत महागाईने (Inflation) उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर झाल असून, गुंतवणूकदार संभ्रम अवस्थेत आहेत. परिणामी सोन्याचे दर कमी झाले आहेत.

दरम्यान येणाऱ्या काळात अमेरिका आपल्या रेपो रेटमध्ये (Repo rate) आणखी वाढ करू शकते. यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण होऊन सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१ हजारावर आहे. तर चांदी ५७ हजार रुपयांवर आहे.

दरम्यान Goodreturns.com या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६,९०० रुपये इतका खाली आला आहे. त्यात २०० रुपयांची वाढ झाली. २४ कॅरेटसाठी ५१,१६० रुपये इतका आहे. त्यात २१० रुपयांची वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात २२ कॅरेटचा भाव ४६,९०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१,१६० रुपये इतका वाढला.

चेन्नईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६,७६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१,०१० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोनं ४६,९०० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ५१,१६० रुपये इतका आहे.