⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सोने चांदीत पुन्हा वाढ ; जाणून घ्या आजचे ताजे दर

सोने चांदीत पुन्हा वाढ ; जाणून घ्या आजचे ताजे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । एक दिवसाच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १५० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १६० रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलो ५०० रुपयाने महागली आहे.

कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा फैलावाने गुंतवणूकदार चिंतेत आहेत तर दुसऱ्या बाजुला अर्थव्यवस्था सावरु लागल्याने सराफा व्यावसायिकांची खरेदी वाढली आहे. परिणामी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव तेजीत आहे. 

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. तर आज बुधवारी पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सोने ४८ हजारांवर गेले आहे. तर चांदी ७५ हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांनंतर १ जूनपासून बाजारपेठ सुरू झाली आणि सोने-चांदीच्या भावात काही दिवस भाववाढ होत राहिली. त्यामुळे १० जून रोजी सोने ५० हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर, मात्र त्यात घसरण होत गेली व २५ जूनपर्यंत ते ४७ हजार ५०० रुपयांपर्यंत आले होते. नंतर १ जुलैपासून दररोज भाववाढ होत गेली. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी २१० रुपयांनी वाढ होऊन ४७ हजार ४९० रुपयांवर पोहोचले.   

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८२८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,२८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५९८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,९८० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ५०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,४०० रुपये इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.