⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

दिवाळीपर्यंत सोने-चांदीचा दर गाठणार मोठा टप्पा? खरेदीदारांना फुटणार घाम : आजचे दर तपासून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज : 13 ऑक्टोबर 2023 : पितृपक्ष सुरु होताच भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. यामुळे सोन्यासह चांदीचा दर सात महिन्याच्या निचांकीवर पोहोचले होते. यादरम्यान सोने 57500 रुपये तर चांदी 68000 रुपयापर्यंत घसरले होते. दिवाळीपर्यंत दर आणखी खाली जाणार असा कयास वर्तविला जात होता. मात्र गेल्या आठवड्यात इस्त्राईल-हमास यांच्यात युद्ध सुरु झाले. त्याचे परिणाम दोन्ही धातूवर होतं असल्याचे दिसत आहे.

या युद्धाने मौल्यवान धातूने मोठी झेप घेतली आहे. जर किमतीत अशीच वाढ होतं राहिली तर दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 61 ते 62 हजारापर्यंतचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. तर चांदीचा 75 हजार रुपयाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

गुडरिटर्न्सनुसार, सोन्याने या आठवड्यात मोठा पल्ला गाठला. सोन्याने या आठवड्यात जोरदार झेप घेतली. सध्या 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 54,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 58,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

दरम्यान, काल सोन्याचा दर 12 ऑक्टोबर रोजी 350 रुपयांनी वधारल्या. त्यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली होती. 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची उसळी घेतली होती. गेल्या शनिवारी 310 रुपयांनी किंमती वाढल्या होत्या. 1600 रुपयांपेक्षा अधिकची झेप सोन्याने घेतली आहे.

दुसरीकडे चांदीच्या किमतीने देखील मोठी झेप घेतली आहे. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. 11 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. 12 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी 71,600 रुपये आहे.