⁠ 
रविवार, मे 19, 2024

ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी! दिवाळीत सोने ४०० रुपयाने घसरले, पहा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२३ । गेल्या महिन्यात पुन्हा उच्चांकी दर गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत मागील काही दिवसात घसरण दिसून आली. दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. सोने ४०० रुपयांनी तर चांदीचा दर ३०० रुपयांनी घसरला आहे. हेच भाव आज देखील कायम राहण्याचा अंदाज आहे. Gold Silver Rate Today

आंतराष्ट्रीय जागतिक घडामोडीमुळे गेल्या महिन्यात सोने आणि चांदीच्या किमती जवळपास चार हजार रुपयांनी वाधरल्या होत्या. ऐन सणासुदीच्या महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंच्या किमती आणखी उच्चांकी गाठणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्यासह चांदीचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला.

या आठवड्यात पण धनत्रयोदशी वगळता सोन्यात घसरण होती. या आठवड्यातील चार दिवसांमध्ये, सोन्यात ८०० ते ९०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरातही १२०० रुपयांची घसरण दिसून येतेय. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

जळगावमधील आजचा सोने चांदीचा दर?
जळगाव सुर्वणनगरीत आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६०,५०० रुपयांवर आला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ७१,२०० रुपयावर आहे. दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर तब्बल ९००० रुपयापर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षीच्या दिवाळीत सोन्याचा दर ५१५०० रुपये प्रति तोळा इतका होता. तर दुसरीकडे चांदीचा दर ५८५०० रुपयापर्यंत होता. मात्र यातही तब्बल १२००० रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६०,५०० रुपयांवर आला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ७१,२०० रुपयावर आहे.