जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२३ । तुम्हाला सोने-चांदी खरेदी (Gold Silver Rate) करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरेतर सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑगस्ट महिना सुखावणारा ठरणार आहे. गेल्या दोन आठवड्यात सोने-चांदीची चमक फिक्की पडली आहे. Gold Silver Rate Today
विशेष म्हणजे एप्रिल नंतर जुलै महिन्यात सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी 62 हजाराचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीनेही 77000 हजाराचा टप्पा गाठला होता. मात्र ऑगस्ट सुरुवातीपासूनच दोन्ही धातूंच्या किमतीत झाली आहे सोन्याचं किमती पुन्हा 60 हजाराखाली आल्या तर चांदी 70 हजाराच्या घरात आलीय.
जळगाव सुवर्णनगरीतील सोने चांदीचे दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,200 रुपायांवर गेला आहे. दुसरीकडे चांदीचा विनाजीएसटी 70,500 रुपये प्रति किलोवर आली आहे.
यापूर्वी 12 दिवसापूर्वी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 60,000 इतका होता. तर चांदीचा एक किलोचा दर 74500 रुपयांवर होता. त्यात आतापर्यंत सोने 700 ते 800 रुपयांनी घसरले आहे. मात्र, चांदी तब्बल 4000 रुपयापर्यंत घसरली आहे.
दरम्यान, जागतिक बाजारातील संकेत ग्राहकांशा आनंदवार्ता देणारे आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती महिनाभराच्या निच्चांकावर आहे. डॉलर अजून मजूबत झाल्यास या किंमतीत ऐतिहासीक घसरण होण्याची शक्यता आहे.