जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या भागात सातत्याने चढ-उतार दिसून आला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी काल शुक्रवारी सोन्याचा भाव किंचित ५० रुपयांनी घसरून ५२,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर दुसरीकडे चांदी ६३० रुपयाने घसरून ६२,८५० रुपये प्रति किलोवर आली आहे. आज शनिवारी बाजार बंद असल्याने दर जाहीर केले जात आहे. दरम्यान, उच्चांक दरापासून सोने जवळपास ४ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांवर गेला होता. त्यातुलनेत सोनं जवळपास ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.५० टक्के वाढ केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. इतर बँकांनी व्याजदर वाढवल्याने कर्जदारांना जोरदार झटका बसला आहे.
या आठवड्यात सोने तीन वेळा स्वस्त दोन वेळा महागले आहे. तर चांदी चार वेळा स्वस्त तर एक वेळा महागली आहे. चार दिवसात सोने जवळपास १०० रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे चांदी ९०० रुपयांनी घसरली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. चांदी देखील ३०० ते ३५० रुपयांपर्यंत महागली आहे.
या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
६ जून २०२२- रुपये ५२,१६० प्रति १० ग्रॅम
७ जून २०२२ – रुपये ५२,०६० प्रति १० ग्रॅम
८ जून २०२२ – रु ५२,१६० प्रति १० ग्रॅम
९ जून २०२२ – रु ५२,२५० प्रति १० ग्रॅम
१० जून २०२२ – रु ५२,२०० प्रति १० ग्रॅम
गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
६ जून २०२२- रुपये ६३,११० प्रति किलो
७ जून २०२२ – रुपये ६३,७६० प्रति किलो
८ जून मे २०२२- रुपये ६३,७०० प्रति किलो
९ जून मे २०२२- रुपये ६३,४८० प्रति किलो
१० जून मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.