वाणिज्य

सोने-चांदीमधील दरवाढ थांबेना ! आजचा काय आहे 10 ग्रॅमचा भाव??

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । गेल्या काही दिवसात सोने-चांदीच्या किमतीत चांगलीच वाढ झालेली आहे. अशातच सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. काल मंगळवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र आज बुधवारी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झालेली आहे. सोबतच चांदीची महागली आहे. Gold Silver Rate Today

काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?
बुधवार, 11 जानेवारी रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 137 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,549 रुपयावर व्यवहार करत आहे. यापूर्वी मंगळवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, एमसीएक्सवर सोन्याचा भाव 174 रुपयांनी घसरून 55,690 रुपयांवर बंद झाला.

दरम्यान, दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. आज चांदीचा दर 600 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 68,975 रुपयावर व्यवहार करत आहे. आज चांदीचा भाव रु.68,501 वर उघडला. परंतु, काही काळानंतर मागणीअभावी चांदी 68,975 रुपयांवर गेली. दरम्यान, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 545 रुपयांनी वाढून 68,355 रुपयांवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढले, चांदी घसरली
आंतरराष्ट्रीय बाजारात आज जिथे सोने हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे, तिथेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आज 0.32 टक्क्यांनी वाढून $1,876.74 प्रति औंस झाला. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर आज 0.05 टक्क्यांनी घसरला आणि 23.65 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button