⁠ 
शुक्रवार, मार्च 1, 2024

सोन्याचा दर पुन्हा 63 हजाराच्या खाली, या आठवड्यात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपायांनी घसरले..

जळगाव लाईव्ह न्यूज । 11 फेब्रुवारी 2024 । सोने चांदीच्या दरात चढ उताराचा काळ सुरुच आहे. कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसत आहे. सध्या सोन्यासह चांदी दराने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. यामुळे सोन्याचा दर पुन्हा ६३ हजाराच्या खाली आली आहे. सोने या आठवड्यात ५०० रुपयांनी स्वस्त झाले. चांदीही ५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला १ फेब्रुवारीला १०० रुपयांनी महागले होते. त्यांनतर २ फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात १०० रुपयाची घसरण दिसून आली होती. मात्र ३ फेब्रुवारीला ४०० रुपयाची वाढ होऊन ४ फेब्रुवारीला ३०० रुपयाची घसरण झाली होती. ५ फेब्रुवारी रविवारीबाजार बंद असल्याने दर जाहीर झाला नव्हता. ६ फेब्रुवारीला ३०० रूपाची घसरण, ७ फेब्रुवारीला आणि ८ फेब्रुवारीला दर स्थिर होता. ९ फेब्रुवारीला त्यात १०० रुपायची तर १० फेब्रुवारीला २००रुपयाची घसरण दिसून आली.

जळगावात आता २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५७,६०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७२००० हजार रुपयावर आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीचा एक किलोचा दर ७२५०० रुपयावर होता. त्यात ५०० रुपयाची घसरण झालीय.