⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; वाचा आजचे नवीन दर..

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; वाचा आजचे नवीन दर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२३ । सणोत्सवानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होताच देशभरात सोन्या आणि चांदीची मागणी वाढली ज्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली. पण सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज, ११ डिसेंबर रोजी खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. सोमवारी आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीही कमी झाल्या आहेत. Gold Silver Rate 11 December 2023

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सोन्याचा दर ९० रुपयांनी घसरून ६१,६५० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे मार्च २०२४ चांदीचे वायदे दर १७५ रुपयांनी घसरून ७२,३२५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ६२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०५० रुपयावर आला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ७२,३०० रुपयावर आहे.

जळगावात गेल्या सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ६३,९०० रुपयांवर विकला जात होता. तर चांदीचा दर ७७,८०० प्रति किलो इतका होता. मात्र त्यांनतर मोठी घसरण दिसून आली. सोने जवळपास १६०० ते १७०० रुपयापर्यंतची घसरण झालेली दिसून येतेय.तर चांदीच्या किमतीत तब्बल ५५०० हजार रुपयाची घसरण झाली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.