जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी संधी आहे. कारण एक दिवसाच्या दरवाढीनंतर आज सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. आज मंगळवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ४०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल १०७० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने ४६० रुपयाने तर चांदी २१० रुपायांनी महागली होती.
आज मंगळवारी आजच्या दरवाढीनंतर जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,१५० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलो ६२,९४० रुपये इतकी आहे. दरम्यान, सोन्याच्या किमती या दिवसातून दोनदा जाहीर होतात. तसेच सोन्याची किंमत ही सोने अधिक दागिण्याच्या घडणावळीचा खर्च यावर अवलंबून असल्यामुळे भावात शहारानुसार तफावत आढळून येते.
गेल्या महिन्यात उच्चांक स्थरावर गेलेले सोने आणि चांदीचे दर आता पुन्हा निच्चांकी पातळीवर येऊ लागले आहे, गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. गेल्या १५ दिवसात सोने २१०० ते २२०० रुपयांनी स्वस्त झाले. तर दुसरीकडे चांदी किमतीत तब्बल ६ हजाराहून अधिकचे घट दिसून आली.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यन्तरी चांदीचा भाव ६२ हजारावर होता. त्यानंतर चांदी मार्च २०२२ महिन्यात ७३ हजारांवर गेली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या घसरणीमुळे चांदी ८ महिन्याच्या निच्चांकीवर आली आहे.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२ मे २०२२- रुपये ५२,९७० प्रति १० ग्रॅम
३ मे २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
४ मे २०२२ – रु ५२,००० प्रति १० ग्रॅम
५ मे २०२२- रु ५१,८०० प्रति १० ग्रॅम
६ मे २०२२- रु ५२,०९० प्रति १० ग्रॅम
७ मे २०२२- बाजार सुट्टी
८ मे २०२२- बाजार सुट्टी
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२ मे २०२२- रुपये ६५,०५०प्रति किलो
३ मे २०२२ – रुपये ६३,७४० प्रति किलो
४ मे २०२२- रुपये ६३,९५० प्रति किलो
५ मे २०२२- रुपये ६३,५७० प्रति किलो
६ मे २०२२- रुपये ६३,८०० प्रति किलो
७ मे २०२२- बाजार सुट्टी
८ मे २०२२- बाजार सुट्टी