सोने चांदी खरेदी करताय ; आधी जाणून घ्या जळगावातील आजचे दर

जून 10, 2021 9:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । जळगावातील सुवर्णबाजारात मागील गेल्या दोन तीन दिवसापासून सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने पुन्हा ५० हजारांच्या दिशेने जात आहे. तर चांदीचा भाव ७६ हजारांच्या पुढे गेले आहे. दरम्यान, आज गुरुवारी सोन्याचा स्थिर आहे. तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

gold (1)

जळगाव जिल्ह्यात ०१ जून पासून निर्बंध शिथिल होताच सोने आणि चांदीच्या भावात वाढ होतानाचे दिसून येत आहे. काल बुधवारी सोन्याचे दर प्रति १० ग्रम ११० रुपयाने वाढले होते, तर चांदी ५०० रुपयांनी महागली होती. 

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७१३ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४७,१३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव

मागील गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून येत आहे. आज चांदीच्या भावात ५०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७६,१०० रुपये आहे.  मागील गेल्या चार-पाच दिवसात चांदीच्या भावात जवळपास साडे पाच हजार रुपयाची वाढ झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now