---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

आज सोने-चांदीचा भाव काय? खरेदीला जाण्यापूर्वी तपासून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे जगभरात आर्थिक मंदीची भीती अधिक गडद झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या (एप्रिल) पंधरवड्यात सोन्याच्या भावाने नवीन विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याच्या किमतीने 61 हजाराचा टप्पा ओलांडला होता. मात्र आता थोडी नरमाई दिसून येत आहे.

gold silver jpg webp webp

तरी पण आजही सोन्याचे भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वरच आहेत. दुसरीकडे चांदीचा दर 75000 हजारावर आहे. दरम्यान, आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची (gold silver) वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

---Advertisement---

जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,600 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत वरचढ दिसून येत आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 63000 ते 65000 हजारापर्यंत जाणार असायचा अदांज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे चांदीचा भाव 75000 रुपये (विनाजीएसटी) प्रति किलो वर विकली जात आहे. दिवाळीपर्यंत चांदी देखील 80000 हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव कसा होता
IBJA दरांनुसार, गेल्या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 60,096 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. मंगळवारी किमती 60,368 रुपयांवर बंद झाल्या. बुधवारी, किमती किंचित वाढल्या आणि 60,434 वर पोहोचल्या. गुरुवारी सोन्याचा भाव 60,382 वर बंद झाला. शुक्रवारी सोन्याचा भाव 60,169 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात चढ-उतार होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---