⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या किमतीत झाला हा बदल ; खरेदीपूर्वी तपासून घ्या भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२३ । सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. मात्र आज चांदीच्या किमतीत वाढ दिसून आलीय. कमोडिटी एक्सचेंज (MCX) सकाळच्या सत्रात सोने 0.02 टक्क्यांनी घसरले आहे. तर चांदी 0.52 टक्क्यांनीवाढले आहे.

MCX वर सोने स्वस्त झाले
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज सकाळी ११ वाजेपर्यंत सोन्याचा भाव किंचित १० रुपयांनी घसरून 55,745 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 55,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

चांदी महागली
चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली. आज चांदी २९७ रुपयांनी वाढले आणि 64,080 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली.

तुम्हाला घरबसल्या सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर तुम्ही अॅपद्वारे सहज शोधू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. सरकारने तयार केलेल्या या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तर तपासू शकताच पण त्यासंबंधीची कोणतीही तक्रारही करू शकता.