⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात घसरण झाली आहे. काल स्थिर राहिल्यानंतर आज बुधवारी सोने दरात किंचित ६० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आज चांदीच्या भावात ७७० रुपयाची घसरण झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात चांदीचा प्रति किलोचा दर २४० रुपयांनी घसरली होती.

जळगावातील सोने-चांदीचा भाव?
आज बुधवार जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५२,०५० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६२,५६० रुपयावर आला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वरखाली होत असल्याचे दिसून आली.तर या वर्षी मार्चमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होउन ते ५५ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रामपर्यंत पोहचले होते. तर चांदी तब्बल ७३ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. मात्र तीन महिन्यात सोन्याचे दर जवळपास ३ हजाराहून अधिकने घसरले आहे. तर चांदी तब्बल १० हजार रुपयांपर्यंत घसरली आहे.

मागील आठवड्यात सोने जवळपास ४०० ते ५०० रुपयाने महागले आहे. तर चांदी २०० ते ३०० रुपयांनी महागली आहे. दरम्यान, गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ मे रोजी सोन्याचा भाव ५२,५०० रुपये प्रति तोळा इतका होता. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५०० रुपयापर्यंत होता.

मे महिन्याच्या मध्यंतरी सोन्याचा भाव ५१ हजारांवर आला होता. तर चांदी ६० हजार रुपयांवर आली होती. मात्र मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढताना दिसून आले. १६ मे रोजी ५१ हजार रुपयांवर असलेला सोन्याचा भाव आज ५२ हजारांवर आहे. म्हणजेच गेल्या १५ दिवसात सोने १२०० रुपयांनी महागले आहे. तर १५ मे रोजी चांदीचा प्रति किलोचा दर ६० हजार रुपयावर होता तो आज ६३ हजार ४०० रुपयावर आहे. चांदी देखील १५ दिवसात तब्बल ३४०० रुपयांनी महागली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६० प्रति १० ग्रॅम
२६ मे २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
२७ मे २०२२ – रु ५२,०६० प्रति १० ग्रॅम
२८ मे २०२२ – बाजार बंद

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो
२६ मे २०२२- रुपये ६२,९८० प्रति किलो
२७ मे २०२२- रुपये ६२,२४० प्रति किलो
२८ मे २०२२- बाजार बंद

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.