बापरे! आज सोने-चांदीने घेतली मोठी झेप, एकदा भाव पहाच..
जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । मार्च महिन्याच्या शेवटची सोन्याच्या किमतीने भलीमोठी उसळी घेतली आहे. एप्रिल महिन्यात दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना करीत आहे. मात्र एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीही महागली आहे.
सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असून जबरदस्त तेजीच्या काळात सोन्याने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात नव्या ऐकतिहासिक उच्चांकावर केली आहे. आज, १ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने सर्वकालीन नवीन उच्चांकावर उडी घेतली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दुपारी ४ वाजेनंतर सोन्याचा दर ७२५ रुपयांनी वाढून ६८,४०२ रुपयावर ट्रेंड करत आहे. बाजार उघडताच सोने १००० रुपयांनी वाढले होते. मात्र त्यांनतर सुधारणा दिसून आली. दुसरीकडे आज चांदीचा दर ५९३ रुपयांनी वाढून ७५,६०० रुपयांवर ट्रेंड करत आहे.
भारतीय सराफ बाजारात आता सोन्याचा दर विनाजीएसटी ६९ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सोन्याने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात नव्या ऐकतिहासिक उच्चांकावर केली आहे. सध्या लग्नसराई सुरू असून सोन्याची मागणी देखील वाढत आहे. वर आणि वधू पक्षांकडून सोन्याचे दागिने खरेदी केली जातात.सोन्याचे दर वाढले असून अनेक कुटुंबांचे सोने खरेदीसाठी आर्थिक बजेट कोलमडत आहे