जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जून २०२१ । गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदीत वाढ झाल्याने भावदेखील वधारले आहेत. आज मंगळवारी जळगावातील सुवर्णबाजारात सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे, तर चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज सोने प्रति दहा ग्रम ११० रुपयाने स्वस्त झाले तर चांदीच्या भावात ४ हजार ५०० रुपयाची वाढ झाली आहे. निर्बंध शिथिल होताच चांदीचे भाव ७७ हजारांच्या पुढे गेले असून, सोनेदेखील ५० हजारांच्या दिशेने जात आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढवले असता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने, चांदी खरेदीकडे आपला ओढा वळवला. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर उच्चांकी ५६ हजार रुपये या पातळीपर्यंत गेले होते.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९३८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,३८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७०३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,०३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
आज चांदीच्या भावात ४५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७६,१०० रुपये आहे.