⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | आज सोनं स्वस्त, चांदी महाग ; तपासा जळगावातील नवीन दर

आज सोनं स्वस्त, चांदी महाग ; तपासा जळगावातील नवीन दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । जळगावच्या सुवर्ण बाजारात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने दरवाढीला ब्रेक लागला असून आज सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सोने प्रति दहा ग्रम ११० रुपयाने वाढले आहे. तर चांदी प्रती किलो १०० रुपयाने वाढली आहे. त्यापूर्वी काल सोमवारी सोने आणि चांदी स्थिर होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक काढून घेतल्याने मागील काही महिन्यात दोन्ही धातूंमधील किमतींमध्ये मोठे चढ उतार दिसून आले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव ५६२०० रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकी स्तरावर गेला होता. आजच्या घडीला सोन्याचा भाव ९००० रुपयांनी कमी झाला असून ते ४७ हजाराच्या घरात आले आहे. तर चांदीत मोठी हालचाल दिसून येत असल्याने आज चांदी ७५ हजार किलो पर्यंत आहे.

दरम्यान, बाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा अपवादवगळता सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून या मौल्यवान धातूंचे भाव पुन्हा वाढीस लागले आहे. मागील गेल्या चार-पाच दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. अखेर काल आठवड्याच्या पहिल्याचा दिवशी सोने चांदी स्थिर होती. तर आज सोन्याचे दर कमी झाले आहे. नजीकच्या काळात तो आणखी कमी होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७७५ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,७५० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५४८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,४८० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी १०० रुपयाने महागली झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७५,००० रुपये इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.