जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात घसरण झाली होती. मात्र, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २१० रुपयांनी महाग झालं आहे. तर चांदीत प्रतिकिलो ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव २१ रुपयांनी वाढून ४,७३९ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,३९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५१३ रुपये इतका आहे. त्यात प्रति ग्रम २० रुपयांची वाढ झाली असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,१३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
आज चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज (०४ मे) चांदी दर ६०० रुपयांची वाढ झाली असून १ ग्राम चांदीचा भाव आज ७३.४ रुपये इतका असून १ किलोचा दर ७३,४०० रुपये इतका आहे.
दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.