सोने-चांदी खरेदी करताय ; आधी जाणून घ्या जळगावातील आजचे दर

जून 3, 2021 9:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । दोन दिवसाच्या भाव वाढीनंतर आज सोन्याचा दर जैसे थे आहे.  मात्र चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जळगावमधील सुवर्णबाजारात आज चांदी ७०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

gold silver rate

देशांतर्गत बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोनेच्या किमती वाढल्यात. जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आले. काल बुधवारी जळगावमधील सुवर्णबाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २१० रुपयांची वाढ झाली.  तर चांदी ६०० रुपयाने वाढली आहे. सततच्या चढ उताराने सोने एकदा पुन्हा ५० हजाराच्या उंबरठ्यावर आले आहे.

 आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९७० रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,७०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७३३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,३३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज चांदी ७०० कमी झाली आहे. त्यामुळे चांदीचा आजचा १ किलोचा भाव ७१,९०० रुपये आहे. मागील तीन चार दिवसात चांदी ६ हजाराहून अधिक स्वस्त झाली आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now