जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२६ । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात चढ-उतार सुरु आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. मात्र दुसऱ्याच दिवशी दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. यामुळे लग्नसराई तसेच सणासुदीसाठी दागिने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली. Gold Silver Rate Today

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे मौल्यवान धातुंना तेजी मिळाल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.गेल्या काही दिवसांत होर्मुझ सामुद्रधुनी रोखण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र, आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. Gold Silver Price Today

काय आहे सोन्याचा दर?
जळगाव सराफ बाजारात आज मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोन्याच्या दरात १४४२ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,६६३ रुपयांपर्यंत वधारले. यापूर्वी काल सोमवारी ३०९ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५५,२२१ रुपयांपर्यंत खाली आले होते.
चांदीचा दर?
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल ८२४० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,५८,५३० रुपयांपर्यंत वधारले. यापूर्वी काल सोमवारी ५१५० रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो २,५०,२९० रुपयांपर्यंत खाली आले होते.












