सोने दरात अचानक मोठी उसळी; आज किती रुपयांनी वाढला भाव?

ऑक्टोबर 31, 2025 2:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली. मात्र आज शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,२०० रुपयांनी वाढले आहेत. मात्र दुसरीकडे चांदी दरात कोणतीही दरवाढ अथवा घसरण झाली नाही. चांदीचे दर जैसे थे आहेत. जर आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर किती ते एकदा वाचून जा…

gold jpg webp

दिवाळीनंतर लवकरच लग्नसराईचा काळ सुरु होणार असून त्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांचा सोनं खरेदीकडे कल वाढला होता. ते आणखी सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत होते. पण आज सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

Advertisements

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,२०० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२२,२६० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,४५० रुपये मोजावे लागणार आहे.

Advertisements

१८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९२,०१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. दरम्यान आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तर चांदीच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. चांदीचे दर जैसे थे आहेत. आज १ किलो चांदीचे दर १,५१,००० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now