अरे देवा! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदी दरात मोठी उसळी, खरेदीपूर्वी तपासून घ्या भाव?

फेब्रुवारी 23, 2026 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२६ । गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. दोन्ही धातूंचे दर अद्यापही सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटबाहेर आहेत. सोने-चांदीचे दर कधी कमी होतील? याकडे ग्राहकांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा मोठी झळ बसली आहे.

gold silver 1 jpg webp

सोन्याचा दर

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्यात प्रति १० ग्रॅम २,०७० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता हे सोनं खरेदीसाठी १,६१,३५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,९०० रुपयांची वाढ होऊन १,४७,९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,५५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२१,०१० रुपये खर्च करावे लागतील.

Advertisements

चांदीच्या दरात मोठी वाढ

दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल २५,००० रुपयांनी वाढली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now