⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | बातम्या | सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव पुन्हा घसरला..

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव पुन्हा घसरला..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२४ । दिवाळीनंतर सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. आता लग्नसराईला सुरुवात झाली असून सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे लग्नसराईत खरेदी करताना प्रचंड खर्च होता. पण आता ऐन लग्नसराईच्या हंगांमात सोन्याच्या किंमती कमी होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून सोन्याच्या खरेदीसाठी दुकांनात गर्दी केली जात आहे.

गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या देशांतर्गत किमती 3700 रुपयांनी घसरल्या होत्या. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 75790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आलाय. जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे.

सध्या मुंबई, कोलकात्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटची किंमत 69,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज 18 नोव्हेंबर 2024 रोजी चांदीची किंमत 89.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,400 रुपये प्रति किलोग्राम आहे. तर 17 नोव्हेंबर रोजी भारतात दीची किंमत 89.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 89,500 रुपये प्रति किलोग्राम होती. सोन्याच्या किंमतींसोबतच आता चांदीच्या दरात देखील घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.