बापरे! सोने 2472 रुपयाने महागले, चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर ; जळगावमध्ये आता असे आहेत दर?

डिसेंबर 12, 2025 2:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२५ । एकीकडे सणासुदीत ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले सोने-चांदीचे दर कमी होतील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, दर कमी होण्याऐवजी वाढले आहेत. सध्या दोन्ही धातूंच्या किमतींनीं नवीन उच्चांक गाठला आहे. विशेष चांदी दोन लाखांच्या उंबरठ्यावर येऊन स्थिरावली. ज्यामुळे ग्राहकांना ऐन थंडीत घाम फुटला आहे.

gold rate 2

सोन्यात इतक्या रुपयाची वाढ
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर १० ग्रॅम सोने दरात २४७२ रुपयाची वाढ दिसून आली. ज्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३४ हजार ९३० रुपयांपर्यंत पोहोचला.

Advertisements

चांदीचा दरात घसरण
गुरुवारी चांदी दरात प्रति किलो ५१५० रूपयांची उसळी घेतली होती. त्यामुळे चांदीने तीन टक्के जीएसटीसह एक लाख ९८ हजार ७९० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर झेप घेतली. चांदीत दोनच दिवसांत १३ हजार रूपयांपेक्षा अधिक दरवाढ नोंदवण्यात आल्यानंतर ग्राहकांसह व्यावसायिक अवाक झाले.आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर १०३० रुपयांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ९७ हजार ७६० रुपयांवर स्थिरावले.

Advertisements

दरवाढी मागचे कारण काय?

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केल्यानंतर, त्याचे थेट परिणाम जागतिक मौल्यवान धातूंच्या बाजारात पाहायला मिळाले. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी उसळी नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोन्याचे दर वाढले असताना चांदीनेही वेग पकडत नवा उच्चांक गाठला. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील व्याजदर कपातीमुळे डॉलरची कमजोरी वाढली असून, त्याचा थेट फायदा सोन्या-चांदीच्या बाजाराला होत असल्याची प्रतिक्रिया सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now