जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात तेजी कायम आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीचा भाव वाढला. जळगाव सराफ बाजारात आज सोने जवळपास १५० रुपयांनी महागले. तर दुसरीकडे चांदी ५७० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल सोने १० रुपयाने महागले आहे. तर चांदी २५० रुपयाने स्वस्त झाली होती.
आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव :
आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,१९० रुपयांवर गेला आहे. तर चांदी ६२,७१० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. गेल्या तीन दिवसात सोने ६८० रुपयाने महागले आहे. तर चांदी ७२० रुपयाने महागली आहे.
गेल्या आठवड्यातील असे होते दर?
२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे. २ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९०० रुपये इतका आहे. ३ नोव्हेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०७० रुपये इतका आहे.
ओमिक्रॉनची भीती वाढल्यास सोने आणि चांदी अधिक महाग
बाजार तज्ज्ञांच्या मते, कोविड ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची भीती वाढल्यास सोने-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. किंबहुना अर्थव्यवस्थेतील दबावाची चिन्हे पाहता गुंतवणूकदार अधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. गेल्या वर्षी कोविडमध्येही असेच दिसून आले होते, जेव्हा भौतिक सोन्याची मागणी नसतानाही गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचल्या होत्या.