जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून आले आहे. या आठवड्यात जळगावात सराफ बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण दिसून आली. आज सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे.
गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव १६८० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे या आठवड्यात चांदी ३ वेळा स्वस्त झाली आहे तर दोन वेळा महागली आहे. त्यात ३५५० रुपयांची घसरण दिसून आली आहे. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर घसरत असल्याने सोने खरेदीची चांगलीच संधी ग्राहकांनी साधल्याचे दिसून आले. त्यातच लग्न सराई सुरु असल्यामुळे ग्राहकांनी गुरुवारी सोने खरेदीसाठीचा वेळ खास राखून ठेवल्याचे दिसून आले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाची दोन हात करत आहे. अनेक ठिकाणी मागील काही दिवसापासून कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असता त्यात आता दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगाची चिंता वाढली आहे. यामुळे येत्या काळात सराफ बाजारात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये इतका आहे. तर शुक्रवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.