⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा भाव

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ नोव्हेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशीच सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव पुन्हा ४९ हजारांवर गेला आहे. आज मंगळवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २८० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा प्रति किलो २६० रुपयाने वाढली आहे. त्यापूर्वी काल १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३४० रुपयांची तर चांदी प्रति किलो ४०० रुपयाची घसरण झाली होती.

जळगावातील आजचा भाव

जळगाव सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,३१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या काही दिवसात जळगाव सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या भावात वाढ दिसून आली होती. सप्टेंबर महिन्यात ४७ हजाराच्या खाली असलेला सोन्याचा भाव ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ होऊन तो पुन्हा ४७ हजारावर गेला. त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ दिसून आली. गेल्या ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या भावात १६८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील मोठी वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झाली.

दरम्यान, आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक सोने खरेदी करतात. काही लोक सोन्याचे दागिने देखील खरेदी करतात. मात्र, ऐन सणासुदीत सोने आणि चांदीचे भाव वाढले आहे. दोन दिवसानंतर दिवाळी आहे. या दिवसात लोक सोनं -चांदीचे दागिने खरेदी करतात. त्यातून आता लग्नसराईचे दिवसही जवळ आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. याच कारणामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत आता २१७० हजारांनी घसरले दर –

जळगाव सराफ बाजारात गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये सोन्याचे दर ५१ हजार २०० रुपये इतका होता. मात्र, यावर्षी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४९,०३० इतका आहे. म्हणजेच  १२ महिन्यांच्या कालावधीतील घसरणीचा ट्रेंड लक्षात घेतला, तर सोने सुमारे २१७० रुपयांनी कमी झाले आहे. दरम्यान, धनत्रयोदशी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर विक्रमी खरेदी होईल, असे चित्र सराफ बाजारात दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (२५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९२० होते, त्यात ४०० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती. मंगळावारी (२६ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० इतका होता. त्यात ४४१० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२७ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,९३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे. शुक्रवार (२९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.