⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सोन्याचा उच्चांक : पुन्हा गाठली ५० हजारी, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

सोन्याचा उच्चांक : पुन्हा गाठली ५० हजारी, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोबतच चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरवाढीने पुन्हा ५० हजारांचा टप्पा गाठला आहे. आज गुरुवारी १० ग्रॅम सोने ५८० रुपयाने महागले आहे, तर चांदी प्रति किलो १३४० रुपयांनी महागली आहे. यापूर्वी काल सोने २८० रुपयाने महागल होतं; तर चांदी प्रति किलो ३२० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

जळगावात सराफ बाजारात आज गुरुवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ५०,००० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६७,४२० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

दिवाळीच्या कालावधीत जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात काहीशी घसरण झालेली दिसून आली. तसेच चांदीच्या दरातही चढ-उतार सुरु होता. मात्र दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होतानाचे दिसून येत आहे. आंतराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे भाव वाढत आहे. जळगाव सराफ बाजारमध्ये गेल्या चार दिवसापासून सोन्याचे दर वाढत आहे. गेल्या चार दिवसात सोन्याच्या भावात १३३० रुपयाची वाढ झाली आहे.  तर दुसरीकडे  गेल्या चार दिवसात चांदीच्या भावात ३ वेळा वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.

मागील गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास १५०० ते १६०० रुपयाची वाढ झालीय. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झालीय.

सोने ६० हजार रुपयांपर्यंत जाणार?

दरम्यान, पुढील काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी होणार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

मागील आठवड्यातील ट्रेंड

जळगावच्या सराफा बाजारात मागील आठवड्यातील सोने आणि चांदीच्या दरातील ट्रेंड काहीसा चढ-उताराचा दिसून आला. तो पुढील प्रमाणे-
– ०१ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०५० रुपये असा होता.
-०२ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,३१० रुपये असा होता.

– ०३ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,७१० रुपये असा होता.

– ०४ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,१०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९३० रुपये असा होता.

– ०५ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६५,६२० रुपये असा होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.