---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोनं हाय रेकॉर्डपेक्षा ८००० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

gold rate (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याची दिसून आले. काल (८ ऑक्टोबर) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने प्रति १० ग्रॅम ९० रुपयाने स्वस्त झालं होतं. त्यामुळे सध्या प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,९२० रुपये इतका आहे. परंतु दुसरीकडे या आठवड्यात चांदीच्या भावात सलग पाच दिवस वाढ झाली. काल प्रति किलो २६० रुपयाने महागली आहे. त्यानंतर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,६९० रुपये इतका आहे.

gold rate (1)

सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात हालचाली दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी किंचित ४० रुपयाची घट झाली होती. तर चांदी मात्र महागली होती. चांदीच्या भावात तब्बल ९६० रुपयाची वाढ झाली होती. गेल्या पाच दिवसात चांदीच्या भावात १६८० रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या आठवड्यात सोन्याच्या भावात काहीशी वाढ झालीय.

---Advertisement---

गेल्या दहा दिवसातील सोने चांदीचा भाव?

जळगाव सराफ बाजारात १ ऑक्टोबर २०२१ रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४७,३७० रुपये इतका होता. तो आज (९ ऑक्टोबर) ४७,९२० रुपये इतका आहे. म्हणजेच गेल्या दहा दिवसात सोन्याच्या भावात ५५० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीचा १ ऑक्टोबर रोजी ६१,०१० रुपये प्रति किलो इतका भाव होता. आज चांदीचा दर किलोमागे ६२,६९० रुपये इतका आहे. म्हणजेच गेल्या दहा दिवसात चांदीच्या भावात १६८० रुपयाची वाढ झाली आहे.

9300 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

ऑगस्ट २०२० मध्ये सोनं ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज सोन्याचा भाव ४७,९२० रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. त्या हिशोबाने आज ८२८० रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत असे होते सोने दर?

सोमवारी (४ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३७० होते, त्यात ४० रुपयाची किरकोळ घसरण झाली होती. मंगळावारी (५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९९० इतका होता. त्यात काल ६२० रुपयाची मोठी वाढ झाली होती. बुधवारी (६ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,८५० रुपये इतका आहे. तर गुरुवार (७ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४८,०१० रुपये इतका आहे. आणि आज (८ ऑक्टोबर) १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,९२० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.

सोने साठवणुकीबाबत नवे नियम
सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक जण सोने खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दरही गगनाला भिडल्याने या सोन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम केले आहेत.

या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वास्तविक घरात सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. कायदेशीर मार्गाने खरेदी केलेले कितीही सोने नागरिक आपल्या घरात ठेवू शकतात. फक्त त्याचे पुरावे खरेदीदाराकडे असायला हवेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार, नागरिक आपल्या घरात सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकतात. मात्र, प्राप्तिकर विभागाकडून घरातील किंवा बँकेच्या लॉकरमधील सोन्याची तपासणी होऊ शकते. अशा तपासणीच्या वेळी सोन्याचा स्रोत तुम्हाला पुराव्यांसह सांगता आला पाहिजे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---