---Advertisement---
वाणिज्य

अखेर घसरणीला ब्रेक.. आज सोने-चांदीच्या किमती घसरल्या ; वाचा ताजे दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । मागील काही सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले. मात्र आज बुधवारी दोन्ही धातूंच्या किमती घसरल्या आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरला आहे. तर दुसरीकडे चांदी 210 रुपायांनी घसरली आहे.

gold silver jpg webp

बुधवारी, वायदे बाजारात सकाळी 11 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरून 51,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा भाव आज 51,450 रुपयांवर उघडला गेला. एकदा उघडल्यानंतर तो 51,537 रुपयांवर गेला. पण, काही काळानंतर सोन्याच्या किमतीत घसरण झाली. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा दर आज 210 रुपयांनी घसरून 61,750 रुपयांवर आला आहे.

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याची स्पॉट किंमत 2.15 टक्क्यांनी वाढून आज 1,710.14 डॉलर प्रति औंस झाली आहे. अलीकडच्या काळातील सोन्याची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत 2.84 टक्क्यांनी वाढून 21.36 डॉलर प्रति औंस झाली आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,300 रुपायांवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव 60,000 वर गेला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---