जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत सलग तिसऱ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात २०० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ३४० रुपये किलोने महागली आहे. यापूर्वीही कालच्या सत्रात सोने ३१० रुपयांनी तर चांदी तब्बल १२१० रुपयांनी वाधरली होती. सध्या भाववाढीने सोने पुन्हा पन्नाशीच्या दिशेने जाऊ लागले आहे.
आजचा सोने-चांदीचा भाव?
आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,५६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६३,८३० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.
गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात ५२० रुपयाची वाढ झाली आहे तर दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून आली. चांदी १६७० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सोन आणि चांदी दरात तेजी दिसून येतेय.
जळगाव सराफ बाजारात ३१ जानेवारी २०२२ सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४८,७३० इतका होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या महिन्याच्या १ फेब्रुवारी रोजी सोन्यात ७० रुपयाची वाढ होऊन सोने ४८,८०० प्रति तोळा इतक्यावर गेला होता. तर दुसरीकडे ३१ जानेवारीला चांदीचा ६२,४६० प्रति किलो भाव होता. तो १ फेब्रुवारीला ६२,४१० रुपये किलो इतका होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंमध्ये हालचाल होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यातील दर
सोने दर :
३१ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७३० रुपये प्रति तोळा
०१ फेब्रुवारी (मंगळवार) ४८,८०० रुपये प्रति तोळा
०२ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,०९० रुपये प्रति तोळा
०३ फेब्रुवारी (गुरुवार) ४९,०५० रुपये प्रति तोळा
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा
०५ फेब्रुवारी (शनिवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा
चांदी दर:
३१ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,४६० प्रति किलो
०१ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६२,४१० प्रति किलो
०२ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६२,८०० प्रति किलो
०३ फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६२,९४० प्रति किलो
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो
०५ फेब्रुवारी (शनिवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो
सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?