⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | दिवाळीपूर्वीच सोने-चांदी महागली, ‘या’ आठवड्यात ‘इतकी’ झाली वाढ

दिवाळीपूर्वीच सोने-चांदी महागली, ‘या’ आठवड्यात ‘इतकी’ झाली वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीपूर्वीच सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम देशांर्तगत बाजारावर दिसून येतोय. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या भावात जवळपास दोन हजार रुपयांची वाढ दिसून येतेय. तर चांदी तब्बल तीन हजार रुपायांनी वधारलेली दिसून येतेय.

काय आहे MCX वर सोन्याचा भाव?
काल आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी MCX वर 24 कॅरेट सोने रुपये 51,999 प्रति 10 ग्रॅमवर इतका होता. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जवळपास 50,100 पर्यंत होता. मात्र त्यात गेल्या काही सत्रात वाढ झालेली दिसून आलीय. या आठवड्यात सोने जवळपास 1900 ते 2000 रुपयांनी महागले असल्याचे दिसून येतेय.

MCX वर चांदीचा भाव?
दरम्यान, दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात चांगलीच उसळी आली आहे. सध्या चांदी 60,751 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा भाव 57,500 रुपयापर्यंत होता. मात्र त्यात गेल्या काही सत्रात वाढ दिसून आली. या आठवड्यात दिवसात चांदी जवळपास 3000 रुपयांनी वधारलेली दिसून येतेय.

जळगाव सुवर्णनगरीतही सोने चांदी वधारली?
जळगाव सुवर्णनगरीतही सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून आली. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 52,500 रुपये इतका आहे. सोन्याचा हा दर सोमवारी जवळपास 51,300 ते 51,400 रुपयापर्यंत होते. त्यात आतापर्यंत जवळपास 1 हजाराहून अधिकची वाढ आलेली दिसून येतेय. दुसरीकडे सध्या चांदीचा प्रति किलोचा भाव जवळपास 62,000 हजार रुपये इतका आहे. हा दर सोमवारी जवळपास 57,500 इतका होता. मात्र त्यात गेल्या काही दिवसात तब्बल 4000 हजाराहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.