जळगावमध्ये सोन्यासह चांदी भाव घसरला ; आता प्रति तोळ्याचा भाव किती?

जानेवारी 8, 2026 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२६ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. दरम्यान आज गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्यासह चांदी दरात घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold silver jpg webp

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोने दरात १०३० रूपयांची घट झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४० हजार २८६ रूपयांपर्यंत खाली आले. बुधवारी दिवसभरात सोन्याचा दर जैसे होते.

Advertisements

दुसरीकडे कालच्या दरवाढीनंतर आज चांदी दरात मोठी घसरण झाली गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर २०६० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५५ हजार ४४० रूपयांपर्यंत खाली आली. यापूर्वी बुधवारी दिवसभरात पुन्हा ३९२० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५७ हजार ५०० रूपयांपर्यंत वधारली होती.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now