⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, वाचा जळगाव सुवर्णनगरीत आजचा भाव

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, वाचा जळगाव सुवर्णनगरीत आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतीय सराफ बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दर एका विशिष्ट पातळीवरून वरखाली होत असल्याचे दिसत आहे. जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम सोने ३१० रुपयांनी महागले आहे. तर दुसरीकडे चांदी १२१० रुपये प्रतिकिलोने महागली आहे. त्यापूर्वी काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने किंचित १० रुपायांनी तर चांदी १२० रुपयांनी महागली होती.

काय आहे आजचा प्रति तोळा?

आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,३६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६३,४९० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात ३१ जानेवारी २०२२ सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४८,७३० इतका होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या महिन्याच्या १ फेब्रुवारी रोजी सोन्यात ७० रुपयाची वाढ होऊन सोने ४८,८०० प्रति तोळा इतक्यावर गेला होता. तर दुसरीकडे ३१ जानेवारीला चांदीचा ६२,४६० प्रति किलो भाव होता. तो १ फेब्रुवारीला ६२,४१० रुपये किलो इतका होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंमध्ये हालचाल होत असल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन आणि चांदीचे भाव वधारून आले.

दरम्यान सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यातील दर

सोने दर :
३१ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७३० रुपये प्रति तोळा
०१ फेब्रुवारी (मंगळवार) ४८,८०० रुपये प्रति तोळा
०२ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,०९० रुपये प्रति तोळा
०३ फेब्रुवारी (गुरुवार) ४९,०५० रुपये प्रति तोळा
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा
०५ फेब्रुवारी (शनिवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
३१ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,४६० प्रति किलो
०१ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६२,४१० प्रति किलो
०२ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६२,८०० प्रति किलो
०३ फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६२,९४० प्रति किलो
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो
०५ फेब्रुवारी (शनिवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.