जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये काल (५ ऑक्टोबर) सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली होती. त्यानंतर आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात १४० रुपयाची घसरण झाली आहे. मात्र आज सलग तिसऱ्या दिवशी चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज चांदी प्रति किलो ४० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल सोने ६२० रुपयाने तर चांदी प्रति किलो ४१० रुपयाने महागले होते.
आजचा सोने आणि चांदीचा भाव
जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,८५० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,४२० रुपये इतका आहे.
गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचा भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होतानाचे दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसात सोने १ वेळा महागले तर दोन वेळा स्वस्त झाले. तर दुसरीकडे तीन दिवसात चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तीन दिवसात चांदी १४१० रुपयाने महागली आहे.
४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत असे होते सोने दर?
सोमवारी (४ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३७० होते, त्यात ४० रुपयाची किरकोळ घसरण झाली होती. मंगळावारी (५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९९० इतका होता. त्यात काल ६२० रुपयाची मोठी वाढ झाली होती. तर आज बुधवारी (६ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,८५० रुपये इतका आहे.
सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाणार
दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते १२ ते १४ हजार प्रति १० ग्रॅम पर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.