⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | आजचा सोने आणि चांदीचा भाव : ५ ऑक्टोबर २०२१

आजचा सोने आणि चांदीचा भाव : ५ ऑक्टोबर २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये  आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात किंचित घट नोंदविली गेली होती. परंतु आज मंगळवारी सोन्याच्या भावात कोणताही बदल दिसून आला नाहीय. आज सोने दर स्थिर आहे. मात्र, दुसरीकडे चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज चांदी प्रति किलो ४१० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल चांदी ९६० रुपये प्रति किलोने महागली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव
जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,३७० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,३८० रुपये इतका आहे. काल चांदीचा दर किलोमागे ६१,९७० रुपये इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, गेल्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० वर गेला होता. परंतु त्यात घसरण होऊन आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,३७० रुपयांपर्यंत आला आहे. या तुलनेत सोने सध्या ८८०० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे.

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या भावात सोने २ हजार रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या भावात जवळपास ६ हजार रुपयाची घसरण झाली आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.