लग्नसराईपूर्वीच सोने-चांदीच्या किमतीत कमालीची वाढ, खरेदीपूर्वी वाचा ताजे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी सोन्याच्या किमतीत जवळपास 700 रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. तर चांदी तब्बल 2 हजार रुपयांहून अधिकने वधारली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर पुन्हा 60 हजारावर गेला आहे. Gold Silver Price Today
देशभरात आज शनिवारी लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. मात्र त्यापूर्वीच सोने चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काल भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत 696 रुपयाची वाढ झाली असून यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,880 रुपयावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल 2,169 रुपयाने महागली आहे. त्यामुळे एक किलोचा दर 60,495 रुपयावर गेला आहे.
लग्नसराईमुळे दागिन्यांच्या मागणीत जबरदस्त वाढ होते. त्यामुळे या सिझनमध्ये दागिने आणि सोन्याचा भाव या गोष्टी प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात. तुमच्याकडेदेखील लग्नकार्य असेल तर सोन्याच्या भावावर लक्ष ठेवत खरेदी करा. दरम्यान, सोने त्याच्या उच्च पातळीच्या दराने सुमारे 5300 रुपयांनी स्वस्तात विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 प्रति 10 ग्रॅमवर विकले जात होते.
जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 51000 रुपायांवर गेला आहे. यापूर्वी हा दर 50,800 रुपये इतका होता. तर दुसरीकडे चांदीचा भाव 60,000 रुपयापर्यंत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)