जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । जळगाव शहरात तनिष्क स्टोअरचा शुभारंभ पश्चिम विभागाचे विभागीय व्यवस्थापक धवल मेहता यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. शुभारंभनिमित्ताने तनिष्कतर्फे ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर सुरु करण्यात आली आहे. ऑफरमध्ये दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीसोबत ग्राहकांना मोफत भेट म्हणून सोन्याचे नाणे मिळणार आहे. १ ते ८ एप्रिल दरम्यान या आकर्षक ऑफरचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे.
तनिष्कचे विभागीय व्यवस्थापक धवल मेहता यांनी सांगितले कि “खान्देशात आमचे पहिले नवे शानदार स्टोअर सुरु होत असल्याची घोषणा करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. देशातील ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीचा ब्रँड म्हणून आम्ही आमच्या सन्माननीय ग्राहकांपर्यंत सहज पटकन पोहचता येण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आमच्या प्रत्येक नव्या स्टोअरमुळे ग्राहकांचे आमच्याशी असलेले संबंध अधिक दृढ होत असल्याची जाणीव निर्माण होते.
आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या रिटेल वातावरणाचे, सर्वोत्कृष्ट कारागिरीचे आणि अनोख्या रचना संवेदनशीलतेचा लाभ मिळावा आणि वेगवेगळ्या भागातील ग्राहकांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी व गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही हे स्टोअर सुरु करत आहोत ग्राहक व कर्मचारी यांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी तनिष्कच्या प्रत्येक स्टोअरमध्ये सुरक्षा नियनचे काटेकोर पालन केले जाते यामुळे याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित व सुविधाजनक खरेदीचा अनुभव घेता येतो.
तनिष्क हा टाटा समूहातील बँड भारतातील ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे. गेल्या दोन दशकांपासून हा खंड उत्तमोत्तम कारागिरी, खास प्रेरणा व संकल्पना घेऊन बनविण्यात आलेले डिझाइन्स, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी यांचे प्रतीक मानला जातो. भारतीय महिलांची आवड, त्यांची स्वप्ने ईच्छा समजून घेऊन परंपरा व आधुनिकता या दोन्हींशी संबंधित गरजा व ईच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील असलेला एकमेव ज्वेलरी बँड हा मान तनिष्कला मिळाला आहे. सध्या देशातील 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये तनिष्कची 300 पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज