5 दिवसांत सोने तब्बल 758 रुपयांनी महागले, आज 10 ग्रॅमचा दर किती? घ्या जाणून

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२३ । भारतीय वायदे बाजारात सलग पाचव्या सत्रात सोने महाग झाले आहे. मात्र दुसरीकडे आज चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळतेय. या महिन्यात आतापर्यंत सोन्याचा भाव ७५८ रुपयांनी वाढला आहे. आज गुरुवार, 5 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा भाव ०.१९टक्के वेगाने व्यवहार करत आहे.

तर चांदीचा भाव (Silver Price Today) ०.०८ टक्क्यांनी घसरला असून ७० हजार प्रति किलोच्या खाली आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव ०.४८ टक्क्यांनी वाढून बंद झाला होता. त्याच वेळी, चांदीचा दर ०.८८ टक्क्यांनी घसरला आणि बंद झाला.

आजचा सोने चांदीचा दर किती?

गुरुवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर सकाळी ९:२५ पर्यंत १०८ रुपयांनी वाढून ५५,८७५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव ५५,७९४ रुपयावर उघडला झाला. एकदा किंमत ५५,९२० रुपयांवर गेली. पण, नंतर थोडी घसरण झालेली दिसून आली.गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव २६९ रुपयांनी वाढून ५५,७९९ रुपयांवर बंद झाला.

चांदी 70 हजारांच्या खाली आली
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीची किंमत लाल चिन्हात व्यवहार करत आहे. चांदीचा दर आज ५३ रुपयांनी घसरून ६९,२६५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. चांदीचा भाव आज ६९,३३० रुपयांवर उघडला. किंमत एकदा ६८,१८० रुपयांवर गेली. पण, काही काळानंतर तो ६९,३३० रुपये झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव ६७० रुपयांनी घसरून ६९,३०० रुपयांवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढले, चांदी घसरली
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर वाढला असला तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 1.04 टक्क्यांनी वाढून 1,856.14 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 0.92 टक्क्यांनी घसरून 23.75 डॉलर प्रति औंस झाला.