वाणिज्य

सोन्याचा दर दोन वर्षाच्या उच्चांकाजवळ ; चांदीने तोडले रेकॉर्ड, जाणून घ्या आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२३ । सोने आणि चांदी (Gold Silve Price) गेल्या काही दिवसापासून सुरु असलेली दरवाढ थांबतच नाहीय. नव्या वर्षाच्या तिसऱ्या आठवड्याच्या व्यवहाराच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत २२४ रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत २८२ रुपयाची वाढ झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय साेने बाजारात जगभरातील प्रमुख बँकांकडून साेन्याची खरेदीत वाढ झाल्याने साेन्याच्या दरात वाढ हाेत आहे. तर चीनकडून इलेक्ट्राॅनिक्स उत्पादनासाठी चांदीची मागणी वाढली असल्याने दरात माेठी वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. Gold Silver Rate Today

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज सकाळी १०.३० पर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर २२४ रुपयांनी वाढून ५५,७५४ रुपायांवर व्यवहार करत आहे. तर चांदी २८२रुपयांनी वाढून प्रति किलो ७०,१९९ रुपयावर पोहोचले.

दरम्यान, चांदीच्या दरात सातत्याने वाढ हाेत आहे. काल मंगळवारी चांदीचे प्रति किलाेचे दर उच्चांकी ७० हजार रुपयांवर पाेहाेचले. एका दिवसातील १९०० रुपयांची तर महिन्याभरात तब्बल सहा हजार रुपयांची वाढ नाेंदवली गेली आहे. साेमवारी संध्याकाळी चांदीचे दर प्रति किलाेला ६८१०० हाेते. ते मंगळवारी सकाळी ६९७२२ झाले. तर दुपारून ते ७० हजार रुपये किलाेवर पाेहाेचले. सुमारे महिन्याभरापूर्वी (५ डिसेंबर) चांदी प्रतिकिलाे ६४ हजार रुपये हाेती.

त्यात सहा हजारांची वाढ हाेऊन मंगळवारी ते ७० हजार रुपये प्रती किलाेवर पाेहाेचले. आंतरराष्ट्रीय साेने बाजारात जगभरातील प्रमुख बँकांकडून साेन्याची खरेदीत वाढ झाल्याने साेन्याच्या दरात वाढ हाेत आहे. तर चीनकडून इलेक्ट्राॅनिक्स उत्पादनासाठी चांदीची मागणी वाढली असल्याने दरात माेठी वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. भारताचा रुपया इतर देशाच्या तुलनेत मजबूत आहे. भारतीय ग्राहकांकडून साेन्याच्या दरात वाढ हाेत असल्याने चांदीची मागणी वाढती आहे. परिणामी दरात वाढ झाल्याचे व्यावसायिक यांनी सांगितले.

शुद्ध सोने असे ओळखा?
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button