⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | दोन दिवसात सोने ५०० रुपयाने स्वस्त, चांदीही घसरली, वाचा आजचे भाव

दोन दिवसात सोने ५०० रुपयाने स्वस्त, चांदीही घसरली, वाचा आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।२९ मार्च २०२२ । सोने खरेदीचा विचार करीत असल्यानं जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३१० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ७५० रुपयाची घसरण झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने २१० रुपयाने तर चांदी ५०० रुपयाने स्वस्त झाली होती. दरम्यान जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोने खरेदीची (Gold Price Today) ही चांगली संधी आहे.

Gold Silver Rate काय आहे आजचा सोने-चांदीचा दर?
आज सोमवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,७८० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,७०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोने भावात जवळपास ४५० ते ५०० रुपयाची वाढ दिसून आली तर चांदीच्या दरात ९०० ते ९५० रुपयांची वाढ झालेली दिसून आलीय. मात्र, दोन दिवसात ५२० रुपयाने स्वस्त झाले तर चांदी १२५० रुपायाने स्वस्त आले आहे.

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धादरम्यान सोने चांदीचे भाव दोन वर्षाच्या उच्चांक पातळीपर्यंत पोहचले होते. या कालावधीत सोन्याचे प्रतितोळा दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले होता. त्यामुळे ९ मार्च रोजी सोने ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये ५६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,६५० रुपये होते. तर २२ मार्च रोजी ५२,८७०, २३ मार्च रोजी ५२,५८०, २४ मार्च ५२,९८० तर आज ५३,३०० इतका आहे. तर दुसरीकडे २१ मार्च ला चांदी ६९,४७० प्रति किलो होती. २२ मार्च ६९,९५०, २३ मार्च ६९,२८०, २४ मार्च ला ६९,८६०, तर आज ७०,९५० रुपये इतका आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.