---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे भाव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. कालच्या भाव वाढीनंतर आज गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर आहेत. तर चांदीत देखील एक दिवसाच्या घसरणीनंतर महागली आहे. जळगाव सराफ बाजारात आज चांदी प्रति किलो ३५० रुपयाने वाढली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी सोने प्रति १० ग्रॅम १२० रुपयाने महागले होते. तर चांदी १ हजार ९० रुपयाने स्वस्त झाली होती.

gold silver 6

गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात हालचाली दिसून आल्या. या आठवड्याचा विचार केल्यास गेल्या ३ दिवसात सोन्याच्या किंमतींत दोन वेळा घसरण झालीय. तर चांदीच्या दरात देखील २ वेळा घसरण झालीय.  

---Advertisement---

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.  

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं होणारी घसरण पाहता ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नसल्याचं तज्ञांचं मत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे.  

चांदीच्या दराचा विचार करता गेल्या महिन्यापासून त्यामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही ७० हजाराच्या वर होते  त्यानंतर किंमतीत घट होऊन ती ६८ हजारांच्या खाली आले आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४,८६९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,६९० रुपये इतका आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६७,९०० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---